
तळटीपFootnote हे महाराष्ट्रातील काही भाषाअभ्यासकांनी मिळून सुरू केलेले प्रकाशन आहे. आम्ही भाषाविज्ञान आणि भाषाअभ्यासाच्या परिघातील लेखन प्रकाशित करतो. तळटीप नावाने एक नियतकालिक आम्ही प्रकाशित करतो.
भाषाध्ययन, कोशकार्य, सैद्धांतिक व उपयोजित भाषाविज्ञानाच्या शाखा, भाषांतर, भाषा आणि समाज, भाषा आणि परिसंस्था, भाषा आणि इतिहास, भाषा आणि संस्कृती, भाषा आणि जीवन, भाषा आणि राजकारण, भाषा आणि विज्ञान, भाषा आणि साहित्य, भाषा आणि व्याकरण, भाषाविषयक पुस्तकांचे परीक्षण, भाषाविषयक परिसंवाद-चर्चासत्रे-व्याख्याने यांची माहिती प्रकाशित करतो. अशा सर्व प्रकारचे अभ्यासपूर्ण भाषाविषयक लेखन तसेच अशा प्रकाशित-अप्रकाशित लेखनाविषयी माहिती व लेखन प्रकाशित करण्यात तळटीप नियतकालिकाला रस आहे.
संपर्काचा पत्ता: taltipfootnote@gmail.com
चलभाष +91 91457 11238 (Wassup)
