Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप – खंड १
मेनू

सप्रेम नमस्कार!

तळटीपFootnote हे महाराष्ट्रातील काही भाषाअभ्यासकांनी मिळून सुरू केलेले प्रकाशन आहे. आम्ही भाषाविज्ञान आणि भाषाअभ्यासाच्या परिघातील लेखन प्रकाशित करतो. तळटीप नावाने एक नियतकालिक आम्ही प्रकाशित करतो.

भाषाध्ययन, कोशकार्य, सैद्धांतिक व उपयोजित भाषाविज्ञानाच्या शाखा, भाषांतर, भाषा आणि समाज, भाषा आणि परिसंस्था, भाषा आणि इतिहास, भाषा आणि संस्कृती, भाषा आणि जीवन, भाषा आणि राजकारण, भाषा आणि विज्ञान, भाषा आणि साहित्य, भाषा आणि व्याकरण, भाषाविषयक पुस्तकांचे परीक्षण, भाषाविषयक परिसंवाद-चर्चासत्रे-व्याख्याने यांची माहिती प्रकाशित करतो. अशा सर्व प्रकारचे अभ्यासपूर्ण भाषाविषयक लेखन तसेच अशा प्रकाशित-अप्रकाशित लेखनाविषयी माहिती व लेखन प्रकाशित करण्यात तळटीप नियतकालिकाला रस आहे.

संपर्काचा पत्ता: taltipfootnote@gmail.com
चलभाष +91 91457 11238 (Wassup)

ताज्या अंकात

  • हिन्दी मराठी वाद नाही, मुद्दा आहे!  डॉ. सुधीर देवरे - भाषा या संवादासाठी म्हणजेच विचारांच्या आदान-प्रदानासाठी असतात. म्हणून सर्व भाषांवर प्रेम करावं, कुठल्याही भाषेचा द्वेष करू नये अशी समन्वयाची भूमिका मराठी माणसाने नेहमीच घेतली आहे. परंतु हिंदी ही भाषा कानामागून येऊन मराठीलाच गिळंकृत करायला निघाली आहे, याची जाणीव महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या सरकारी निर्णयानंतर महाराष्ट्राला झाली. मराठीला अभिजात दर्जाचं गाजर दाखवत मागच्या दाराने हिंदीला राजरोस प्रवेश देण्याचाच हा प्रकार! या निर्णयाला जोरदार विरोध झाल्यानंतर हिंदीची सक्ती नसून तिसरी… पुढे वाचा
  • शब्दलेखन  कल्याण जोशी आणि मनोहर राजर्षि - संगणक आणि भ्रमणध्वनीवर चालणारे, देवनागरीत लिहिलेला मराठी शब्द बरोबर आहे की नाही हे सांगणारे 'शब्दलेखन' हे उपयोजन आहे. याचे निर्माते/प्रवर्तक कल्याण जोशी आणि मनोहर राजर्षि यांनी सुरुवातीला उपलब्ध पुस्तकांचा आधार घेऊन मराठी व्याकरणाचा अभ्यास केला. संगणकाला व्याकरण शिकवण्याचे आव्हान पेलताना शब्दकोशांचाही उपयोग झाला. नामांचे सामान्यरूप सिद्ध करताना तिन्ही लिंगातील नामांचे मिळून किमान साठ प्रकार असावेत, असे लक्षात आले. विशेषणांची वर्गवारी, सकर्मक-अकर्मक धातू, धातुसाधित नामे व विशेषणे अशा रूपांची व्यवस्था लावली.… पुढे वाचा

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme