Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप – खंड १
मेनू

सप्रेम नमस्कार!

तळटीपFootnote हे महाराष्ट्रातील काही भाषाअभ्यासकांनी मिळून सुरू केलेले प्रकाशन आहे. आम्ही भाषाविज्ञान आणि भाषाअभ्यासाच्या परिघातील लेखन प्रकाशित करतो. तळटीप नावाने एक नियतकालिक आम्ही प्रकाशित करतो.

भाषाध्ययन, कोशकार्य, सैद्धांतिक व उपयोजित भाषाविज्ञानाच्या शाखा, भाषांतर, भाषा आणि समाज, भाषा आणि परिसंस्था, भाषा आणि इतिहास, भाषा आणि संस्कृती, भाषा आणि जीवन, भाषा आणि राजकारण, भाषा आणि विज्ञान, भाषा आणि साहित्य, भाषा आणि व्याकरण, भाषाविषयक पुस्तकांचे परीक्षण, भाषाविषयक परिसंवाद-चर्चासत्रे-व्याख्याने यांची माहिती प्रकाशित करतो. अशा सर्व प्रकारचे अभ्यासपूर्ण भाषाविषयक लेखन तसेच अशा प्रकाशित-अप्रकाशित लेखनाविषयी माहिती व लेखन प्रकाशित करण्यात तळटीप नियतकालिकाला रस आहे.

संपर्काचा पत्ता: taltipfootnote@gmail.com
चलभाष +91 91457 11238 (Wassup)

ताज्या अंकात

  • हिंदी राष्ट्रवाद  डॉ. चिन्मय धारूरकर - आलोक राय यांनी स्वतःच पूर्वी इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाचे 'हिंदी राष्ट्रवाद' हे हिंदीतील पुनर्लेखन. हे पुस्तक संस्कृतनिष्ठ भाषेच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आणि हा प्रश्न फक्त हिन्दीचाच नाही, तर अनेक भारतीय भाषांचा आहे हे मांडते. शब्दांचं आपल्या भाषांमधील साहचर्य आणि वापराची परंपरा यावरून ते सहजसोपे की बोजड वाटतात हे ठरतं. मराठीतही प्राकृत आणि फार्शी-अरबी शब्द सहजतेने रुळले असले, तरी संस्कृत शब्दांना प्रोत्साहन देण्यात आलं आहे. आलोक राय यांनी हिन्दीच्या इतिहासात संस्कृतीकरणापासून… पुढे वाचा
  • राजकारणी संस्कृततज्ज्ञ-आचार्य रघु वीर  डॉ. निर्मला कुलकर्णी - संस्कृत भाषेचे व्यासंगी अभ्यासक आचार्य रघु वीर यांना अवघे साठ वर्षांचे आयुष्य लाभले, परंतु त्यांच्या अभ्यासविषयांचा आवाका आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची जंत्री पाहून कोणीही थक्क होईल. सहसा आधुनिक काळातील संस्कृतचे अभ्यासक राजकारणापासून चार हात दूर राहिलेले दिसतात. विसाव्या शतकातील आचार्य रघु वीर आणि त्यांचे सुपुत्र लोकेश चंद्र मात्र याला अपवाद ठरले. रघु वीरांनी संस्कृत आणि संस्कृती या विषयांमध्ये अलौकिक कार्य करीत असतानाच संसद सदस्य म्हणूनही उत्तम कामगिरी पार पाडली. अनेकानेक… पुढे वाचा

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme